बँकेच्या मेसेजचा क्रीनशॉट दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. बंगळुरूमधील एका महिलेने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर करून लोकांनी सावध रहावे, अशी विनंती केली आहे. बंगळुरूमधील एका महिलेला कॉल आला. स्कॅमर्सने सांगितले की, आदिती, मला तुमच्या वडिलांना पैसे पाठवायचे होते. परंतु ते सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांनी मला तुम्हाला पैसे पाठवायला सांगितले आहे. कॉलनंतर तत्काळ आदितीला दोन एसएमएसचे अलर्ट आले. हे पैसे आल्याचे मेसेज होते. हे मेसेज त्या व्यक्तीशी फोनवर बोलताना आले.
मेसेजनंतर त्या व्यक्तीने पुन्हा फोन केला आणि सांगितले की, मला तुम्हाला 3 हजार रुपये पाठवायचे होते. परंतु चुकून 30 हजार रुपये पाठवले. कृपया बाकीचे पैसे परत पाठवा. मी डॉक्टरच्या समोर उभा आहे. मला त्यांना पैसे पाठवायचे आहेत. परंतु मी बारकाईने मेसेज पाहिले. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, माझ्या फोनवर आलेले मेसेज हे बँकेतून आले नव्हते, तर त्याने मला साधे मेसेज केले होते, असे या महिलेने म्हटले आहे.