शुक्रवारपर्यंत आटपून घ्या बँकेची कामं, पुढे चार दिवस बँका बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज व परवा म्हणजेच शुक्रवारी बँकेची जी कामं आहेत ती पूर्ण करून घ्या कारण त्या पुढील चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. सोमवार व मंगळवार म्हणजेच 15 व 16 मार्च या दिवशी बँकांच्या युनियनने खासगीकरणा विरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे या दोन दिवशी बँकांमधील कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

गुरुवारी बँका महाशिवरात्रीनिमित्त बंद असणार आहेत. त्यानंतर महिन्याचा दुसरा शनिवार व त्यानंतर रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर 15 व 16 डिसेंबर ला बँकांच्या युनियनने खासगीकरणाविरोधात कामकाज बंदची हाक दिल्याने या दिवशी बँकातील कामांवर परिणाम होणार आहे.