बनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी

503

पुणे विभागीय समितीने बनवडी ग्रामपंचायतीची पाहणी केली असून ग्रामस्वच्छता अभियानासाठी राज्यस्तरीय पातळीवर निवड होइल, अशी अपेक्षा आहे. याचे सर्वश्रेय ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी यांना द्यावे लागेल. बनवडी ग्रामपंचायतीने यापुर्वी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यामध्ये स्मार्ट व्हेलेज, विमा ग्राम, केंद्रीय पर्यावरण, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पायाभूत सुविधा आदींसह इतर पुरस्कारांचा समावेश असल्याने ही बनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल ठरली आहे, असे सरपंच परिषदेचे अध्यक्ष शंकराव खापरे यांनी सांगितले.

बनवडी(ता. कराड) येथील ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2018 /19 पुणे विभागस्तरीय समिती यांनी बनवडी गावची पाहणी केली. यावेळी पुणे विभागाचे उपायुक्त राजाराम झेंडे सहा उपायुक्त सिमा जगताप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राजेंद्र चिकणे, सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, पुणे विभागाचे विस्तार अधिकारी चंदुगडे पाणी पुरवठा कक्ष अधिकारी बोंबले, पाणी व स्वच्छता जि.प सातारा किरण सायमोने, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, अजय राऊत, राजेश इंगळे, बनवडीचे मार्गदर्शक शंकरराव खापे, सरपंच उषाताई करांडे, उपसरपंच हरुण नाईक, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले आदी उपस्थित होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना वाजत गाजत वाजत गाजत ढोल ताश्यांच्या गजरात गावांमध्ये त्यांचे आगमन झाले. पुणे विभागीय स्तरातून प्रत्येक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील बनवडी आणि मानेचीवाडी या दोन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. हि निवड राज्यस्तरावर होणार आहे त्यासाठी पुणे विभागीय संत गाडगेबाबा स्वच्छता समितिने गावातील विविध विकास कामाची पाहणी केली यामध्ये प्रामुख्याने दप्तर तपासणी, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प, शालेय व्यवस्थापन, रस्ता व अंतर्गत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, चोवीस बाय सात फिल्टर पाणी योजना प्लँस्टिक बंदी, आरोग्य विषयक सुधारणा, ग्रामसभा, संगणकीकरण, पाहणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या