बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बदलापूर

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण भरून वाहू लागलं आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना आधीच हे धरण भरल्यामुळे ठाणे जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली आहे. एमआयडीसीच्या अखत्यारीत येणाऱ्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या भागात पाणीपुरवठा होतो. यावर्षी सुरुवातीच्याच काही दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे हे धरण दरवर्षीच्या तुलनेत लवकर भरलं असून यामुळे ठाणे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. बारवी धरण आणि परिसरात पावसामुळे येथील निसर्ग अधिकच खुलून दिसत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.