
‘मेरा साया’ या सुपरहिट चित्रपटातील ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’ हे गाणे आजही तितकेच प्रसिद्ध आहे जितके 54 वर्षांपूर्वी होते. या अजरामर गाण्यामुळे बरेली सारख्या छोट्याशा शहराचा बाजार देशभरात प्रसिद्ध झाला. या बाजारात हरवलेला ‘तो’ झुमका सापडला आता 54 वर्षानंतर सापडला आहे.
बरेली(U.P): ‘झुमका तिराहा’ कार्यक्रम का लोकार्पण करते हुए केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार। इस मौके पर सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन भी किया गया। pic.twitter.com/MWQIXA0usA
— ANI_HindiNews (@AHindinews) February 9, 2020
ज्या झुमक्याने बरेली शहराला ओळख दिली त्या झुमक्याची मोठी प्रतिकृती या शहराच्या मध्यभागी उभारण्यात आली आहे. 2 क्विंटल वजनाचा व 20 फूट उंचीचा हा झुमका तांब्यापासून बनविण्यात आला आहे. या झुमक्याचे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी उद्घाटन केले.
असा झुमका शहरात उभा करायचा हा प्रस्ताव 1990 साली मांडण्यात आला होता. मात्र पैशाअभावी हे काम पुढे पुढे जात गेलं. अखेर बरेली विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षा दिव्या मित्तल यांनी पुढाकार घेत यासाठी फंड जमा केला व या झुमक्याचे काम पार पाडले. या झुमक्यासाठी तब्बल 60 लाख रुपये खर्च झाल्याचे समजते.



























































