बुस्टर डोस नाकावाटे देता येणार? तिसरी चाचणी यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱया बीबी-154 या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेकने या लसीचा डेटा ड्रग रेग्युलेटरीकडे सादर केला असून ही लस पहिल्या आणि दुसऱया क्लिनिकल चाचणीत सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. ही लस बुस्टर डोसप्रमाणे दिली जाणार आहे.

ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस याआधी घेतले आहेत, त्यांना बुस्टर डोसच्या रूपात बीबी-154 लस दिली गेली असून लसीच्या परिणामांची माहिती राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाला देण्यात आली आहे. ही लस घेतल्यानंतर क्लिनिकल ट्रायलमध्ये ज्या व्यक्तींना लसीचा डोस देण्यात आला आहे, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले आहे.