व्हीवोनंतर आता नाईकीसोबतचा करारही मोडणार; 14 वर्षांची मैत्री बीसीसीआय तोडण्याच्या तयारीत

779

हिंदुस्थान-चीन यांच्यामधील तणावामुळे व्हिवो या चिनी कंपनीसोबतच्या करारावर पाणी सोडण्याची वेळ बीसीसीआयकर आली असतानाच आता त्यांचा आणखी एक महत्त्वाचा करार तुटण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियातील खेळाडूंच्या जर्सीवर नाईकी या कंपनीचा लोगो असतो. गेली 14 वर्षे बीसीसीआय व नाईकी यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. पण लॉकडाऊनमुळे आता हा करारही मोडणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

नाईकीने चार वर्षांसाठी बीसीसीआयला 370 कोटी रूपये दिले आहेत. यामध्ये प्रत्येक सामन्यामागे 85 लाख व 12 ते 15 कोटींची रॉयल्टी यांचा समावेश आहे. मात्र लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानच्या 12 आंतरराष्ट्रीय लढती रद्द करण्यात आल्या. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व झिम्बाब्बे यांच्याविरूद्धच्या मालिका खेळवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बीसीसीआयसह नाईकी कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या करारानुसार नाईकीकडून बीसीसीआयला खेळाडूंचे शूज व जर्सी मोफत मिळतात.

टेंडर काढण्याची घाई नको

सध्या कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने नाईकीसोबत काडीमोड केल्यास मोठी पंचाईत होऊन बसेल असे काही तज्ञांचे मत आहे. नव्या स्पॉन्सर्सशिपसाठी बीसीसीआयने टेंडर काढण्याची घाई करायला नको असेही काहींचे म्हणणे आहे. नाईकी कंपनीला यावेळी काही सूट देण्याची गरज आहे असेही त्यांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या