
बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय मॅन्बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय मॅनेजमेण्ट ग्रुपसोबतचा (आयएमजी) करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आयएमजी बीसीसीआयसोबत होती. आयपीएल या स्पर्धेच्या आयोजनाचे अधिकार याच कंपनीकडे होते. पण यापुढे आता वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे टेण्डर काढण्यात येणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी देण्यात आली. तसेच बीसीसीआयकडूनच आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे अधिकार इतर कुठल्याही कंपनीला देण्यात येणार नाहीत.
आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आयएमजीसोबत करार करण्यात आला होता. बीसीसीआयकडून दर वर्षी 27 कोटी त्यांना दिले जात होते. 2009 साली दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या स्पर्धेदरम्यान त्या पंपनीला 33 कोटी देण्यात आले होते. 2017 साली पाच वर्षांचा करारही करण्यात आला होता. करार संपायला दोन वर्षे बाकी असतानाच बीसीसीआयने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.





























































