BCCI पहलगाममधील 26 जणांची निर्घृण हत्या विसरली; हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर कुंकू गमावणाऱ्या पीडितेचा संताप

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पीडित पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी एशिया कप २०२५ मधील हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं आहे. ऐशन्या यांनी लोकांना टीव्हीवरही हा सामना पाहू नये, असं आवाहन केलं आहे. मला हे समजत नाहीये. मी लोकांना यावर बहिष्कार टाकण्याची विनंती करते, असं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ऐशन्या द्विवेदी म्हणालाय आहेत.

ऐशन्या द्विवेदी यांनी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळवर (BCCI) टीका करताना म्हटले की, “बीसीसीआय दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांच्या कुटुंबांप्रती संवेदनशील नाही.” त्या म्हणाल्या की, ‘बीसीसीआयने हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील सामना स्वीकारायला नको होता… मला वाटते की, बीसीसीआय त्या २६ कुटुंबांबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांबद्दल संवेदनशील नाही.”

ऐशन्या द्विवेदी म्हणाला, ‘आपले क्रिकेटपटू काय करत आहेत? क्रिकेटपटू राष्ट्रवादी असतात, असं म्हटलं जातं. हा आपला राष्ट्रीय खेळ मानला जातो. एक-दोन क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे येऊन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, असं म्हटलं नाही. बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांनी त्यांच्या देशासाठी उभे राहिले पाहिजे. पण ते तसं करत नाहीत.’

त्या पुढे म्हणाल्या की, “मी प्रायोजक आणि सामना प्रसारकांना विचारू इच्छिते की, त्या २६ कुटुंबांचे राष्ट्रीयत्व संपले आहे का? सामन्यातून मिळणारे उत्पन्न कशासाठी वापरले जाईल? पाकिस्तान ते फक्त दहशतवादासाठी वापरेल. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना महसूल द्याल आणि त्यांना पुन्हा आमच्यावर हल्ला करण्यासाठी तयार कराल.”