बीडीडीतील झोपडीवासीयांना मिळणार 300 चौरस फुटांचे घर, सरकारकडून नियमात सुधारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडीडी चाळीतील झोपडपट्टीवासीयांना 300 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत येणाऱया झोपडीवासीयांना सुधारीत नियमांनुसार या 300 चौरस फुटांचे घर मिळावे अशी मागणी रहिवाशांनी केली होती. या मागणीची दखल घेत नगरविकास विभागाकडून याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या परिसरात असणाऱया झोपडपट्टय़ांचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या नियमाप्रमाणे या झोपडपट्टीवासीयांना 269 चौरस फुटांचे घर देण्यात येणार होते. मात्र नवीन नियमांनुसार त्यांना 300 चौरस फुटांचे घर त्यांना देण्यात यावे अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली होती. त्यावर म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडून याविषयीची सुधारणा नगरविकास विभागाला सुचवली होती. त्यानुसार नगर विकास विभागाकडून ही सुधारणा करण्यात आली आहे. यावर महिनाभरात हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत.