
महाराष्ट्रात राहणाऱया प्रत्येकाला मराठी भाषेचा गर्व असलाच पाहिजे, असे प्रतिपादन गौर गोपाल दास यांनी आज मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी ः महाराष्ट्र टेक लार्ंनग वीक’ या कार्यक्रमात केले. भाषा महत्त्वाची असतेच, पण कुठली भाषा बोलायची यापेक्षा आपला मुद्दा पोहोचणे गरजेचे आहे, मराठी बोलता बोलता आपला मुद्दाच पोहोचला नाही तर मराठीचे काय लोणचे घालायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या कौशल्य विकासासाठी ‘टेक वारी’ महाराष्ट्र टेक लार्ंनग वीक’ हा सप्ताह 5 मे ते 9 मे दरम्यान मंत्रालयात साजरा केला जात आहे. याचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गौर गोपाल दास हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मराठी भाषेबाबत बोलताना त्यांनी मराठीतील ‘ळ’ या अक्षराची महती यावेळी सांगितली. ते म्हणाले की, ‘ळ’ हा मराठीचा अभिमान आहे, मराठी भाषेतला ‘ळ’ गेला तर होळी नाही, पोळी नाही, मिसळ नाही, काही नाही.