महिलांना दाढीवाले पुरुष आवडतात का क्लीन शेव्ह ? संशोधनातून मिळाले उत्तर

2334

हल्ली पुरुषांमध्ये दाढी राखण्याचा ट्रेंड रुढ झाला आहे. उत्तम दाढी राखल्यास महिला,तरुणी आपल्याकडे आकर्षित होतात असा अनेकांचा समज आहे. पूर्वी पुरुषांमध्ये असा समज होता की क्लिन शेव्ह गुळगुळीत चेहऱ्याचे पुरुष महिलांना आवडतात. संशोधकांनी हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवत संशोधन केलं.

संशोधकांना दिसून आलं आहे की दाढी राखणाऱ्या पुरुषांकडे महिलांचे आकर्षित होण्याचे प्रमाण जास्त आहे. संशोधकांनी म्हटलंय की दाढी राखणारे पुरुष हे शारीरिक आणि सामाजिक पातळीवर जास्त प्रभावी वाटतात. बहुधा यामुळेच महिला त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात. ज्या महिलांना दाढी राखणारे पुरुष आवडत नाहीत त्यातील बहुतांश महिलांना केसातील उवा आणि इतर जंतूंची किळस किंवा भीती वाटत असते. या भीतीमुळे त्यांना दाढीवाले पुरुष आवडत नाही.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या अभ्यासासाठी 1 हजार महिलांची निवड केली होती. या महिलांचा वयोगट 18 ते 70 असा होता. या महिलांना त्यांच्या साथीदाराच्या दाढीबाबत प्रश्न विचारले होते. या महिलांना 30 पुरुषांचे फोटोही दाखवण्यात आले. फोटोंमधील काही पुरुष हे रांगडे दाखवण्यात आले होते तर काही पुरुष मवाळ चेहऱ्याचे दाखवण्यात आले होते. यासाठी फोटोशॉप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. फोटोशॉपद्वारे फोटोतील पुरुषांच्या भुवया, जबडा, डोळे आणि गाल यात बदल करण्यात आले होते. हे फोटो पाहिल्यानंतर महिलांना विचारण्यात आलं होतं की या पुरुषांबद्दलचे आकर्षण तुम्हाला दीर्घकालीन असेल का अल्पकालीन. त्यांना 0 ते 100 या अंकांमध्ये गुण द्यायचे होते. हे गुण पाहिल्यानंतर महिलांना दाढी राखणारे पुरुषच जास्त आवडत असल्याचं दिसून आलं.

आपली प्रतिक्रिया द्या