बीड जिल्ह्यात सहा जागेसाठी 232 उमेदवारांचा अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 232 उमेदवारांनी 317 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघात 29 उमेदवारांनी 43 अर्ज दाखल केले आहेत. माजलगाव विधानसभा मतदार संघात 65 उमेदवारांनी 91 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघासाठी 54 उमेदवारांनी 71 अर्ज दाखल केले आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 26 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले आहेत. केज विधानसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 26 अर्ज दाखल केले आहेत. तर परळी विधानसभा मतदारसंघासाठी 41 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी सहा विधानसभा मतदार संघात तब्बल 152 उमेदवारांनी 203 अर्ज दाखल केले आहेत.