
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना नेते तथा माजी खासदार आनंद राव आडसूळ हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर होते. यादरम्यान त्यांनी धारुर येथील तालुका शिवसेनेच्या मदत केंद्रास भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, लुकाप्रमुख नारायण कुरुंद, युवासेना तालुकाप्रमुख पुरुषोत्तम सोळंके, राजकुमार शेटे, माजी तालुकाप्रमुख विनायक ढगे, शहरप्रमुख बंडू शिनगारे, माजी नगरसेवक यशवंत गायके, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख गणेश पवार, सुनिल भांबरे, नितीन सद्येवाल यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांसह शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, शेतकर्यांना नुकसानभरपाई आणि सरसकट कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आनंदराव आडसूळ म्हणाले.





























































