बीड जिल्ह्यात आज 80 जण कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी दुपारी आलेल्या अहवालात ६२४ जणांपैकी ८० जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत तर ५४४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज बीड जिल्ह्यातील १५० जणांना डिस्चार्जही देण्यात आला. कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा ११ हजार ६२९ वर पोहचला आहे.

आज अंबाजोगाईमध्ये १७, आष्टीमध्ये १७, बीड १७, धारूर ७, गेवराई ३, केज ३, माजलगाव ३, पाटोदा ६, शिरूर ४, वडवणी तालुक्यामध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ हजार ६२९ झाला आहे. आज १५० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ९ हजार ७१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली. तर १५४९ जण बीड जिल्ह्यामध्ये उपचार घेत आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर ८३.५३ एवढा आहे. बीड जिल्ह्यात एकुण ३६६ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. मृत्युचा दर ३.१५ एवढा आहे.