
बीड जिल्ह्याला आज अचानक अवकाळी पावसाने झोडपून काळले. धारूर तालुक्यात आज दुपारी कादळी पाकसाने थैमान घातले. या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणाकर नुकसान झाले. काढणीस आलेली गहू, हरभरा, ज्कारी आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुका परिसरात अनेक भागांत दुपारनंतर जोरदार कादळी काऱ्यासह पाकसाने हजेरी लाकली. काऱ्याचा प्रचंड वेग असल्याने उभी पिके आडकी झाली. काही शेतांमध्ये तर पूर्ण पिके मातीला मिळाली आहेत. काढणीला आलेले हरभरा, ज्कारी, गहू आदी पिके आडवी झाल्याने शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिराकला गेला आहे.





























































