बीड जिल्हा कोरोनामुक्तीपासून सात पाऊले दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्याने कोरोनाला तसे जखडून ठेवले आहे. एप्रिलच्या शेवटपर्यंत बीड जिल्ह्यात एक ही रुग्ण नव्हता. त्यानंतर कोरोना संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यात आरोग्य विभागाला मोठे यश मिळाले. कोरोनामुक्ती पासून आता केवळ सात पाऊले दूर असलेल्या बीड जिल्ह्यात आज पुन्हा 4 जणांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. केवळ 7 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

सतर्कता, खबरदारी, प्रतिबंधात्मक उपाय योजना, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रभावी उपचार यासाठी दिवसरात्र परिश्रम घेणारे शेकडो आरोग्य विभागाचे योद्धे यामुळे बीड जिल्हा सुरक्षित आणि कोरोना पासून दूर राहिला. शेजारच्या जिल्ह्यात कोरोना चा कहर सुरू असताना बीड जिल्हा मात्र सर्वात मोठे झालेले स्थलांतर झेलत जिल्ह्यात परत आलेल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत कोरोना संक्रमण रोखण्यात यशस्वी झाला,. तब्बल साडेतीन लाख नागरिक कोरोनाच्या संकटात बाहेरच्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात परत आले., कोरोना थैमान माजवतो की काय अशी भीती व्यक्त केली गेली. मात्र आरोग्य विभागाच्या जबाबदार कामगिरी मुळे बीड जिल्ह्याने कोरोनावर विजय मिळवला आता पर्यंत केवळ 115 च्या आसपास रुग्ण जिल्ह्यात बाधित झाले.

गेल्या दोन दिवसात 14 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आता केवळ 7 रुग्णावर उपचार सुरू आहेत, कोरोना मुक्ती पासून बीड जिल्हा फक्त सात पाऊले दूर आहे, काल 107 जणांची तपासणी करण्यात आली त्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह आले पुढचे चार दिवस बीड जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत, तीन दिवसांपूर्वी पाच सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सॅम्पल घेतले जातील ते सर्व निगेटिव्ह आले तर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे, एकंदरीत बीड जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार अन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांचा पॅटर्न यशस्वी झाला आहे.