प्राचार्य बापाने तिन्ही मुलीवर केला अत्याचार; आरोपी पित्यास अटक

5525

एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या नराधमाने दोन मुलीवर बलात्कार तर तिसर्‍या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बापाविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाल्याने तालुक्यात गुरुवारी खळबळ उडाली.

या प्रकरणी पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी की आरोपी आपल्या पोटच्या तिन्ही मुली बरोबर सतत अत्याचार करत होता. हा प्रकार तिनही पिडीत मुलींनी आपल्या आईला सांगूनही सर्व नातेवाईकांनी आरोपीस पाठीशी घालून, गप्प बसा नाही तर तुम्हालाच मारून टाकू, अशी धमकी दिली. पिडीत मुलिंनाच बेदम मारहाण केली म्हणून आईसह इतर नातेवाईकांविरुद्ध ही केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी नराधम बापासह आई, भाऊ, चूलते, चुलतभाऊ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केज तालुक्यात मानवतेला आणि पिता, पुत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून आठ वर्षापूर्वी याच नराधम पित्याने त्याच्या पोटच्या मुली सोबत बळजबरीने बलात्कार केला होता. तसेच दुसर्‍या मुली सोबतही अशाच प्रकारे बलात्कार केला. काही दिवसांपुर्वी आई गावाला गेल्या नंतर तिसर्‍या मुलीला जवळ घेऊन तिच्याजवळ झोपून तिच्यावरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. 31 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुली झोपलेल्या खोलीत जावून थोरल्या मुलीच्या छातीला वाईट हेतूने स्पर्श केला. आणि हा प्रकार आईला सांगितलास तर आणि याची वाच्यता करू नको म्हणून तीला काठीने व लाकडाने बेदम मारहाण केली. तसेच दोरखंडाने गळा देखील आवळून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. रात्री विष पाजून त्यांना जीवे मारण्याचा कट ही आखला आसल्याची माहिती पिडीत मुलीने आपल्या फिर्यादीत लिहीली आहे. हा सर्व प्रकार तीनही पिडीत बहिणींनी जिवाच्या भीतीने सहन केला. परंतु जन्मदात्या पित्याचा हा अन्याय सहन न झाल्याने एका मुलीने तिच्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर मैत्रिणीने तिच्या मावशीमार्फत एका सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. नंतर पीडित मुलीने वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पीडित मुलींची सुटका केली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पिता नवनाथ काकड पित्याविरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे. तसेच आई, भाऊ, चुलता व चुलत भाऊ यांच्यावरही आरोपीला पाठिशी घातल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या