बीड जिल्ह्यात कोट्यवधींचा धान्य घोटाळा; जिल्हाधिकाऱ्यांचा छापा, झाडाझडती सुरू

4146

परमिट कागतोपत्री खतवून रेल्वे द्वारे आलेला माल तसाच काळ्या बाजारात विक्रीसाठी हैदराबादकडे रवाना करणाऱ्या पुरवठा विभागाचे बिंग अखेर फुटले. आपल्या दुकानाचे कार्ड ऑनलाईन झाले नाही हे कारण पुढे करत जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य कमी देण्याचे प्रकार सुरू होते अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी स्वतः छापा टाकून गोडाऊनची झाडाझडती सुरू केली आहे, कोट्यवधींचा घोटाळा उधडकीस येणार असल्याने घोटाळेबाजाचे धाबे दणाणले आहे.

बीड जिल्ह्यात धान्य घोटाळ्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून बिनदिक्कत पणे सुरू आहे. अनेकदा हा घोटाळा उघडकीस आला. थातुर माथुर कारवाई झाली, निलंबन झाले ,ज्याच्यावर कारवाई झाली ते पुन्हा सेवेत रुजू झाले अन घोट्याळयाला पाय फुटले हे कायमचेच आहे. आता पुन्हा एकदा कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस येत आहे. आज जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी अचानक बीड मधील धान्य गोडाऊनवर छापा टाकला. संपूर्ण चौकशी सुरू केली गेल्या चार तासापासून जिल्हाधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

बीड जिल्ह्यात धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होतो, परळी रेल्वे स्टेशनवरून बहुतांश धान्य काळ्या बाजारात रवाना होते, काळ्या बाजारात जाणारे तेवढे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना खाते ऑनलाइन झाले नसल्याचे कारण पुढे करत कमी द्यायचे तब्बल पन्नास टक्के धान्य प्रत्येक दुकानदारांना कमी द्यायचे , पुन्हा उरलेला माल गोडाऊन मध्ये येऊन पडला की प्रत्येक पोत्यातून दोन ते अडीच किलो धान्य रात्रीच्या वेळी काढून घ्यायचे, त्या पेक्षा भयंकर बाब या गोडाऊन मध्ये असणारा वजन काटाच दोषयुक्त असल्याचे समोर येत आहे तब्बल एक ते दीड किलो वजन कमी असल्याचे समोर येत आहे, बीड जिल्ह्यातील दर महिन्याला कोट्यवधींचा घोटाळा करणारे भ्रष्ट हात कोणाचे आहेत हे शोधून काढणे महत्वाचे आहे, केवळ गोडाऊन किप्पर की वरिष्ठ अधिकाऱ्याचे हात यात गुंतले आहे हे शोधण्याचे काम जिल्हाधिकारी यांना करावे लागणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या