त्यांना स्वतःचे कपडे फाडून घ्यावे लागतील! बीडमधील काका-पुतण्याचा वाद ऐरणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jaydutt-kshirsagar

बीड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असणाऱ्या क्षीरसागर घराण्यातल्या काका पुतण्याचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा बीड मध्ये आल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांनी आपले काका आणि राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली होती. पुतण्याच्या या आरोपांना जयदत्त क्षीरसागर यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनाच स्वत:चेच कपडे फाडून घेण्याची वेळ येईल असा पलटवार त्यांनी केला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे.

जयदत्त क्षीसागर म्हणाले, मी चारित्र्य जपणारा माणूस आहे. कुणावरही उगाच आरोप प्रत्यारोप करणं आवडत नाही. राजकारणात काही मुल्य असावीत या मताचा मी आहे. मात्र जे कुणी आरोप करताहेत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. जे कपडे फाडायची भाषा करतात त्यांनी स्वत:चे कपडे फाडायची वेळ येईल.