आपला नाद करायचा नाही…सुरेश धस यांनी मुंडेना ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

तिकडं कोणाचाही नाद करायचा, फक्त सुरेश धस चा कधी नाद करायचा नाही, आपला नाद केला की आपण सहाच महिन्यात उलटी करून पलटी करतो असे आमदार सुरेश धस यांनी ठणकावून सांगितले धस यांचा रोख विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याकडे होता.

आष्टी पाटोदा मतदार संघातील शिरूर नगरपंचायत सुरेश धस यांच्या ताब्यात असतांना राष्ट्रवादीच्या एका नेत्याने यात लक्ष घालून अविश्वास ठराव दाखल करत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतली होती. मात्र आमदार सुरेश धस यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेत प्रकरण निकाली काढत पुन्हा नगर पंचायत आपल्या ताब्यात घेतली, नगर पंचायत ताब्यात आल्यानंतर रविवारी शिरूर मध्ये विजयी सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कोणाच्या नगर पंचायत मध्ये काय चालत हे सगळं आपल्याला माहीत असते, तेथे ही आमचे लोक आहेत पण आपण बोलत नाहीत, त्यामुळे सगळ्याचा नाद करायचा फक्त आपला नाद करायचा नाही, सहाच महिन्यात उलट करून पलटी करत असतो असे सुरेश धस म्हणाले त्याचा रोख विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या कडे होता, व्यासपीठावर राष्ट्रवादी चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते.