बोगस सोयाबीन बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल, बीडमध्ये दोन तर परळीत एक गुन्हा

710

निकृष्ट व बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने यापूर्वीच दिले आहेत. सदोष सोयाबीन बियाण्यांचे वितरण आणि विक्री करून शेतकऱ्यांचे 15 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी जानकी सिड्स अ‍ॅन्ड रिसर्च प्रा.लि.म्हैसपूर (जि.अकोला), यशोदा हायब्रीड सिड्स हिंगणघाट (जि.वर्धा) या दोन बियाणे कंपनीविरूद्ध गुरूवारी बीड शहर ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत, तर ग्रीन गोल्ड सिड्स प्रा.लि.(संभाजीनगर) या कंपनीविरूद्ध परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. न उगवलेल्या सोयाबीनप्रकरणी जिल्ह्यात प्रथमच तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत बीड पंचायत समितीचे कृषी अधिकारी भुजंग खेडकर यांनी बीड शहर ठाण्यात गुरूवारी तक्रार नोंदवली. यंदा खरिप हंगामात जानकी सिड्स अ‍ॅन्ड रिसर्च प्रा.लि.व यशोदा हायब्रीड सिड्स हिंगणघाट या बियाणे कंपन्यांनी बीड तालुक्यात अनेक कृषी सेवा वेंâद्रामार्पâत मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाण्यांची विक्री केली असून मात्र पेरलेले या कंपनीचे बियाणे उगवलेच नाहीत. याबाबत जानकी सिड्सच्या बियाणांबाबतीत 117 तर यशोदा सिड्सचे बियाणे उगवले नसल्याच्या 40 अशा एकुण 157 तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. नंतर बियाणे तक्रार विनारण समितीने प्रत्यक्ष पेरणी झालेल्या क्षेत्रावर जाऊन पाहणी केली. तिथे बियाणे न उगवण्यामागे अनेक गंभीर बाबी समोर आल्याने हे बियाणे सदोष असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आली आहे.

त्यामुळे या दोन्ही बियाणे कंपन्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी दर्जाहिन बियाण्यांचे उत्पादन, प्रक्रिया व विपनन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जानकी सिड्स अ‍ॅन्ड रिसर्च प्रा.लि.कंपनीसह त्यांचे जबाबदार व्यक्ती अनिल रमेश धुमाळे व यशोदा हायब्रीड सिड्स हिंगणघाट या कंपनीसह प्रदीप माणिक पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहय्यक निरीक्षक गजानन जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या