बीडमध्ये व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी, एकाच दिवशी 86 जण पॉझिटिव्ह

4434

बीड शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक आवळला जात असल्याने शहरातील व्यापारी, दुकानदार, मजूर यांची चाचणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. आज रॅपिड अँटीजेन चाचणीत 2601 जणांचे स्वब घेण्यात आले. त्यात 86 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड शहरातील कोरोनाची गती कमी करण्यासाठी भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर बी पवार, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, सीइओ अजित कुंभार यांच्यासह व्यापारी संघटनेचे संतोष सोहनी विनोद पिंगळे यांच्या सहकार्याने बीड शहरात आज व्यापारी, दुकानदार, उद्योगातील मजूर यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. या तपासणीसाठी 3 दिवस व्यापार पेठ बंद ठेवण्यात आल्या. ज्या दुकानदारांची चाचणी झाली त्यालाच आपले दुकान पुन्हा उघडता येणार असा आदेश काढला गेला.

आज पाच ठिकाणी सेंटर उभारण्यात आले या सेंटरमध्ये 2601 जणांचे स्वब तपासण्यात आले. त्यात 86 जण कोरोना बाधित निघाले आहेत. अजून दोन दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या