बीडची चिंता वाढतेय, चोवीस तासात 224 कोरोना रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. दिवसभरामध्ये 224 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाधितांपैकी 136 जण हे नवीन बाधित आहेत. तर उर्वरित सहवासातील आहेत.

बीड जिल्ह्यात 3424 जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यात 3200 जणाचा अहवाल निगेटिव्ह आला तर 224 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये अंबाजोगाई 18, आष्टी 43, बीड 30, धारूर 8, गेवराई 28, केज 34, माजलगाव 6, परळी 20, पाटोदा 11, शिरूर 17, वडवणी 9 अशी संख्या आहे. गेल्या दोन चार दिवसात बीड जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत धिम्या गतीने वाढ होवू लागली आहे. चिंतेची बाब म्हणजे 60 टक्के नवीन रुग्ण आढळले आहेत.

आज दिवसभरात 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकुण आकडा 90 हजार पार झाला आहे. मृत्युचा आकडा 2407 वर जावून पोहचला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 15.25 एवढा आहे. डेथ रेट 2.67 टक्के आहे. आतापर्यंत 86 हजार 259 जणांनी कोरोनावर मात केली. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 85.80 एवढा झाला आहे. 5 लाख 90 हजार जणांच्या आतापर्यंत तपासण्याही करण्यात आल्या.