शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले, असा रंगला बीडचा शिवजन्मोत्सव सोहळा

1434

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी भव्य-दिव्य, ऐतिहासिक मिरवणुकीचे आयोजन केले. पंजाब, केरळ, प. बंगाल, ओरिसा या चार राज्यातील कलापथकांचे सादरीकरण झाले. त्याचबरोबर महाराष्ट्राची श्रीमंती दर्शविणार्‍या सहाशे कलावंत असणाऱ्या ढोल आणि झांज पथकाचा गजरही घुमला. गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय ठरत असलेल्या बीडच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचा जयजयकार कानाकोपर्‍यात घुमला. शेकडो कलावंतांनी अविस्मरणीय कला सादर केली.

बीडच्या शिवजयंतीला बीडकरांचा मोठा प्रतिसाद प्रतिवर्षी मिळत आहे. आतापर्यंत महिलांसाठी शिवजयंतीत वेगळी व्यवस्था केली गेली नव्हती. दोन वर्षात प्रथमच संदिप क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शिवजयंती ही अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्याचा नवा आदर्श बीडमध्ये सुरु झाला. बुधवारीही असाच भव्यदिव्य आणि आदर्श शिवजयंती महोत्सव साजरा झाला. पंजाब, केरळ, प. बंगाल, ओरिसा येथील दोनशे सदस्यांचा समावेश असलेल्या पथकांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.

beed2

सकाळी शिवरायांची शासकीय पूजा अन प्रशासनाकडून मानवंदना देत अभिवादानापासून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी भव्यदिव्य शिवदिंडी आयोजित करण्यात आली. दुपारी 2 वाजता भव्य-दिव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रा मार्गस्थ झाली. यानंतर माळीवेस, शहर पोलिस ठाणे आणि फक्त महिला व मुलींसाठी राखीव शो आयोजित केलेल्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्सच्या मैदानात कलाकारांनी आपली अनोखी कला सादर केली. या भव्य दिव्य मिरवणूकीचे साक्षीदार होण्याचे भाग्य जिल्हाभरातील शिवप्रेमींना लाभले.

beed

चित्त थरारक खेळ
पंजाब, केरळ, प. बंगाल, ओरिसा राज्यासह महाराष्ट्रातील कलाकारांचे चित्त थरारक सादरीकरण काळजाचा ठोका चुकवत होते. सायंकाळी विशेष शो सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मैदानावर आयोजित केला. या ठिकाणी सुरक्षेची पुरेपुर दक्षता घेण्यात आली. शिवप्रेमींच्या सेवेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे स्वयंसेवक आणि तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. शेकडो महिलांनी फेटे बांधले होते, अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती साजरी झाली.

beed1

600 कलावंताचे ढोल पथक
या वर्षी तब्बल सातशे कलावंत सहभागी असलेले ढोल अन झांज पथक लक्षणीय होते. बीड शहरातील लेझीम पथकाचाही सहभाग होता. हजारो शिवप्रेमी या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. संपूर्ण बीड शहर भगवेमय झाले होते. तरुणांमधील उत्साह मोठा होता. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आपली प्रतिक्रिया द्या