बीडमध्ये मालकाने केले तब्बल 25 दुकानांचे भाडे माफ

4614

माजलगाव शहरातील साखरे कॉम्प्लेक्सच्या सर्व 25 दुकानांचा  एक महिन्याचा भाडे कोरोना आपत्तीमुळे माफ करण्यात आला आहे. कॉम्प्लेक्सचे मालक जगदीश साखरे यांनी या राष्ट्रीय आपत्तीमुळे कोसळलेल्या संकटात उदारमताने हा निर्णय घेतला आहे.

देशावर  कोरोनाचे आलेले संकट  राष्ट्रीय आपत्ती आहे त्यामुळे 25 मार्चपासून 14 एप्रिल पर्यंत  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी एकवीस दिवस लॉकडाऊन केले आहे. त्याचा परिणाम सर्वत्र झाला आहे. माजलगाव शहरातील  साखरे कॉम्प्लेक्स मधील सर्व दुकाने बंद आहेत. सर्व व्यवहार ठप्प असल्याने सर्व दुकानदार धंदा तर नाहीच परंतु महिन्याचा भाडे कसा भरणार या चिंतेत अस्वस्थ होते. त्यांची ही अस्वस्थता जगदीश साखरे यांच्या लक्षात आली. विविध  कॉम्प्लेक्सचे मालक जगदीश साखरे  व डॉ. उत्तरेश्वर साखरे यांनी देशावर या संकटात सापडलेल्याना 1 महिन्याचा  भाडे माफ केले व दिलासा दिला त्यामुळे सर्व भाडेकरूंनी साखरे यांचे आभार मानले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या