एका अपघातातून वाचले, दुसऱ्या अपघातात बीडमध्ये सहा जणांचा जागीत मृत्यू

बीडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सहा प्रवासी असलेली SUV गाडी डिव्हायडरला धडकली. अपघात झाल्यानंतर सर्व प्रवासी बाहेर पडले पण तेव्हाच एका गाडीने या सर्व प्रवाशांना उडवलं. त्यात या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार गेवराईजवळ गढी पुलावर एका SUVची डिव्हायडरला धडक बसली. गाडीला धडक बसल्याने सर्व प्रवासी खाली उतरले तेव्हा एका भरधाव ट्रकने या सर्व प्रवाशांना उडवलं. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.