बीड जिल्ह्यातील गर्भाशय प्रकरण, डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतला आढावा

34

सामना प्रतिनिधी । गेवराई

बीड जिल्ह्यात गर्भाशय पिशवीच्या शस्त्रक्रिया यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने याची चांगलीच दखल घेतली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. या बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. प्रदिप व्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व सबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीस त्यांच्यासमवेत विद्याताई चव्हाण तसेच स्त्री आधार केंद्राच्या ज्योती कोतकर उपस्थित होत्या.

गेवराई उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. गर्भाशय शस्त्रक्रियांचे प्रकरण बीड जिल्ह्यात अधिक असल्यामुळे महिला रुग्णांना भीती घालून त्यांची आर्थिक लूट केली जात होती. जिल्हाभरात हे प्रकरण ऐरणीवर आले होते हजारो महिलांच्या जीवनाशी खेळण्याचा धंदा काही खाजगी डॉक्टरांनी जिल्हा भरात चालवला चालवला होता. या अनुषंगाने विधानपरिषदेचा उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी मंगळवारी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना योग्य उपयुक्त सूचना केल्या.

बैठकीनंतर डॉक्टर नीलम ताई गोऱ्हे यांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर शिवसेनेच्या वतीने बीड जिल्हा परिषदेचे सभापती यूद्धाजीत पंडीत यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांची माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या