बीडमध्ये युवासेना शेतकऱ्यांच्या बांधावर, अंकित प्रभूंनी केली नुकसानीची पाहणी

1163

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य अंकित सुनिल प्रभू बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आज गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव परिसरातील शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरिप पिकाचे प्रचंड नुकसान झाले. हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिराऊन नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीड जिल्ह्यामध्ये येऊन गेले. त्यांनी जिल्हाभरातील अनेक गावांना भेटी दिल्या. त्यानंतर युवासेनेचे पदाधिकारीही शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्ह्यामध्ये येत आहे. आज युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य अंकित सुनिल प्रभू यांनी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. धीर धरा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. त्यांच्यासोबत सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, युवासेना जिल्हाधिकारी सागर बहीर, कालिदास नवले, साहिल देशमुख आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या