घोटाळा 100 कोटींचा शिक्षा फक्त ताकीद, पंचायत राज समितीचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

बीड जिल्हापरिषदेत 100 कोटींचा घोटाळा प्रकरणी चौकशी पूर्ण झाली सचिवांनी आपल्या साक्ष पंचायत राज समिती समोर नोंदवल्या. दिलेली उत्तरे बघून समिती ने संताप व्यक्त केला. दोषी अधिकारयांना फक्त ताकीद दिली गेली बीड जिल्हापरिषदेत अजून ही गैर कारभार सुरूच आहे म्हणत सचिवांना फैलावर घेत, पुन्हा आयुक्तांची साक्ष घ्या, नव्याने चौकशी सुरू करा असे पंचायत राज समितीने सुनावले.

बीड जिल्हा परिषदेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्या कालावधीत तब्बल 100 कोटीच्या गैर व्यवहार प्रकरणी काल पंचायत राज समिती समोर सचिवांनी साक्ष नोंदवल्या आणि समिती अक्षरशः थक्क झाली. ज्या आधिकाऱ्यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला त्या अधिकाऱ्यांना फक्त ताकीद दिली गेली. घोटाळ्यातील मास्टर माईंड मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांना पुन्हा अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी पद बहाल केले. ज्या चौकशी करून कारवाई झाल्या त्या थातूर माथूर झाल्या. भ्रष्ट्राचाराला पाठिशी घालण्याचे काम झाले, ही गंभीर बाब आहे.

अजूनही बीडच्या जिल्हापरिषदेत गलथान कारभार सुरूच आहे. बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्याचा पदभार शाखा अभियंत्याकडे देण्यात आला. सर शिपायांना साहेबांचा चार्ज दिला गेला तर गैरकारभारच होणार या शब्दात समिती ने संताप व्यक्त करत जिल्हापरिषदेतील घोटाळ्याची पुन्हा चौकशी करा, आयुक्तांची साक्ष पुन्हा नोंदवा, एकही घोटाळेबाज सुटला गेला नाही पाहिजे असे आदेश काल पंचायत राज समितीने दिले आहेत.