मनोज जरांगे यांच्या बैठकीत उठला आग्या मोहोळ

रविवार 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची आज आंतरकाली सराटी येथे सरपंचांच्या शेतात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. चर्चा सुरू होण्याआधीच बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला झाला. बैठकीसाठी आलेल्या काही जणांना मधमाशांनी चावा घेतला.

कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलकले. या वेळी कार्यकर्त्यांनी अंगावर बागायती रुमाल घेतला. त्यांनीही सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. बैठकीच्या ठिकाणी मधमाशा आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पुन्हा मराठा समन्वयकांच्या बैठकीला सुरुवात झाली.