
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱया टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बलाढय़ संघांविरुद्ध टी 20 आणि वन डे मालिका खेळणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी 20 लढतींची तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी 20 आणि 3 वन डे लढतींची अशा मालिका खेळणार आहे.
टीम इंडियाला यंदाच्या विश्वचषकाआधी झटपट क्रिकेटचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने बीसीसीआयने या मालिकांचे आयोजन केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकन संघ या मालिकांसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहेत.
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली लढत
यजमान हिंदुस्थानी संघाची पहिली टी 20 लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 सप्टेंबरला मोहालीत खेळवली जाणार आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरी टी 20 23 सप्टेंबरला नागपुरात तर तिसरी टी 20 लढत 25 सप्टेंबरला हैदराबाद येथे खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी 20 सामना 28 सप्टेंबरला थिरुवनंतपूरम येथे, दुसरी टी 20 लढत 1 ऑक्टोबरला गुवाहाटीत तर अखेरचा सामना 3 ऑक्टोबरला इंदूर येथे खेळवला जाईल.
आशिया चषक यूएईतच खेळवणार
यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनाबाबतची अनिश्चितता आता बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या स्पष्टीकरणानंतर संपली आहे. यंदाचा टी 20 फॉरमॅटची आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब आमिरातीतच (यूएई) खेळवली जाणार हे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
असे आहेत विश्वचषकाआधीचे टीम इंडियाचे सामने
हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका
पहिला टी 20 सामना 20 सप्टेंबर मोहाली
दुसरा टी 20 सामना 23 सप्टेंबर नागपूर
तिसरा टी 20 सामना 25 सप्टेंबर हैदराबाद
हिंदुस्थान -दक्षिण आफ्रिका टी 20 मालिका
पहिली टी 20 लढत 28सप्टेंबर थिरुवनंतपूरम
दुसरी टी 20 लढत 1 ऑक्टोबर गुवाहाटी
तिसरी टी 20 लढत 3 ऑक्टोबर इंदूर
हिंदुस्थान- दक्षिण आफ्रिका वन डे मालिका
पहिला वन डे सामना 6 ऑक्टोबर रांची
दुसरा वन डे 9 ऑक्टोबर लखनौ
तिसरा वन डे 11 ऑक्टोबर दिल्ली


























































