चिन्यांचा नवा आदेश, मुस्लिम दुकानांमध्ये इस्लामिक चिन्हांच्या वापरावर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजिंग

चिनी सरकारने देशातील मुस्लिम नागरिकांसाठी नवा आदेश जारी केला आहे. प्रशासनाने राजधानी बीजिंगमधील सर्व मुस्लिम दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे इस्लामिक चिन्ह वापरण्यावर बंदी घातली आहे. यासह या दुकानांमध्ये काम करणाऱ्या मुसलमानांना अर्धा चंद्र किंवा अरबी भाषेत ‘हलाल’ लिहिलेले शब्द किंवा अन्य चिन्ह तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

बीजिंगमधील एका नुडल्सच्या दुकानावर अरबी भाषेमध्ये लिहिलेला ‘हलाल’ शब्द व इस्लामिक चिन्ह हटवण्याचे आदेश चिनी अधिकाऱ्यांनी दुकानाच्या मॅनेजरला दिले आहे. जोपर्यंत ते चिन्ह हटवण्यात आले नाही, तोपर्यंत तो अधिकारी त्याच ठिकाणी उभा राहिला होता. यावेळी त्या अधिकाऱ्याने मॅनेजरला सांगितले की, ही विदेशी संस्कृती आहे, तुम्हाला चिनी संस्कृतीचे पालन करायला हवे.

चीनमध्ये 2016 पासून अरबी भाषा आणि इस्लामिक चिन्हांविरोधात अभियान सुरू आहे. चिनी संस्कृती वाढवण्यासाठी विदेशी संस्कृतींना हद्दपार करणे हा या मागिल उद्देश आहे. चिनमध्ये सध्या 2 कोटींपेक्षा जास्त मुसलमान राहतात. त्यांच्यावर चीनने यापूर्वीही अधिक निर्बंध लादलेले आहे.