
बेळगावमधील मराठी माणसासाठी आंदोलनात उतरून आवाज उठवणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते चंद्रकांत कोंडुस्कर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून आणि हाती भगवा देऊन त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
मागील लोकसभा पोटनिवडणुकीत चंद्रकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला होता. शिवसेनेचे काम आणि मराठी माणसासाठी नेहमी पुढाकार घेऊ अशी भावना त्यांनी या प्रवेशासमयी व्यक्त केली. यावेळी सीमाभागातील शिवसेना संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.

























































