… म्हणून बेन स्टोक्स दुसऱ्या कसोटीतून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

उद्या (गुरुवार) पासून टीम इंडियाविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. पहिल्या कसोटीत स्वस्तात बाद झालेल्या डेव्हीड मलान ऐवजी ओली पोप याला संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंडला पहिली कसोटी जिंकून देण्यास महत्त्वाचे योगदान देणाऱ्या बेन स्टोक्सलाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका नाईट क्लबमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी न्यायालयात सुनावणीसाठी हजर रहावयाचे असल्याने स्टोक्सला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

हिंदुस्थानविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने दमदार कामगिरी केली होती. संपूर्ण सामन्यात स्टोक्सने ६ बळी घेतले होते. परंतु दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी विराट कोहलीसह अन्य चौघांना बाद केल्याने इंग्लंडला सामना जिंकता आला होता.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ –
जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, अॅलिस्टर कुक, सॅम कुर्रम, केटोन जेनिंग, ओली पोप, जॅमी पोर्टर, आदिल राशिदग, क्रिस वोक्स.