
आपल्या मसाल्याच्या डब्यातील लवंग हा खूप उपयुक्त मसाला आहे. आपल्या आरोग्याच्या समस्येवर मात करण्यासाठी लवंगचा उपयोग हा बहुमोली आहे. लवंग हा एक फायदेशीर मसाला असून, आयुर्वेदात लवंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लवंग आपल्यासाठी उपयुक्त आहे कारण आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास लवंग मदत करते.
लवंग तेलाचे आरोग्यासाठी फायदे

दातदुखीपासून आराम मिळविण्यासाठी लवंगेचा वापर केला जातो. दाढ दुखत असल्यास, आपण दाढेमध्ये लवंग धरल्यास दाढदुखीचा त्रास कमी होतो. त्यामुळेच लवंग हा दाढदुखीवर रामबाण उपाय मानला जातो.
दाढदुखीच्या बरोबरीने लवंग तेल आपण डोकेदुखीवरही वापरता येते. लवंग तेल हे डोकेदुखीवर जालीम इलाज आहे. या तेलामध्ये असलेले दाहक गुणधर्म डोकेदुखीचा समूळ नाश करतात. तसेच आपले डोके ठणकत असेल तर ही ठणकही कमी होते.
लवंग तेल आपल्या गुडघ्यांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. गुडघेदुखीची समस्या असणारे बरेचदा लवंग तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून गुडघ्यांना लावतात. त्यामुळे गुडघेदुखीचे प्रमाण अंशतः कमी होते.

खोबरेल तेलामध्ये लवंग तेल मिसळून त्यात थोडे मीठ घालावे. हे मिश्रण दुखणाऱ्या भागावर चोळावे आणि हे तेल जिरवावे. त्यामुळे दुखणे खूप कमी होते.
लवंग तेल हे आता आपण केसांसाठी सुद्धा वापरू शकतो. यामुळेही खूप सारे फायदे आपल्याला मिळतात. लवंग तेल आणि तिळाचे तेल मिक्स करून केसांना लावल्याने, केस गळती कमी होते. तसेच केसांना चकाकी सुद्धा प्राप्त होते.
दात दुखल्यावर आता त्या ठिकाणी लवंग ठेवण्यापेक्षा लवंग तेल लावणे केव्हाही सोयिस्कर आहे. त्यामुळे दातदुखीपासून नक्कीच आराम मिळेल.
लवंग तेलाचा उपयोग आर्थरायटिस, डोकेदुखी इत्यादी समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण करू शकतो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)






























































