
– रात्रभर आपले शरीर डिटॉक्स करत असते. सकाळी उठल्यावर डोळ्यांतून घाण येत असते, लघवी जास्त पिवळी असते आणि शरीर नको ते घटक बाहेर टाकत असते. अशा वेळी आवळा हा शरीर क्लिन्झ करतो आणि तो सौम्य रेचकाचे काम करत असतो.
– आवळा हा पाचक असतो. त्यामुळे पचनशक्ती सुधारून आपले चयापचय किंवा मेटाबॉलिझम आवळ्यामुळे वाढते आणि त्याचा एकंदर शरीरावर सकारात्मक परिमाण होतो.
– आवळय़ात क्रोमियम असते. त्यामुळे वाईट कॉलेस्टेरॉल (एलडीएल) कमी होऊ शकते आणि रक्तातील ग्लुकोज कमी होण्यास पण मदत होते. तसेच उच्च रक्तदाब कमी व्हायला मदत होते.
– आवळ्यात जीवनसत्त्व ‘सी’ असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व लोह आणि कॅल्शियम अशा क्षारांचे अभिशोषण अजून चांगले होते.
– मधुमेही असल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे आवळ्यातील जीवनसत्त्व ‘सी’चा त्यांना फायदा होतो.
– आवळा चवीला तुरट, आंबट असला तरी त्याचा शरीरावर अल्कलाइन परिमाण होतो. ऑसिडिक पीएचमध्ये शरीर रोगी बनते आणि अल्कलाइनमुळे निरोगी.
– आवळा डोळे, त्वचा आणि केस यांच्यासाठी उत्तम असतो.
– आवळा हा नैसर्गिक फॅट बर्नरचे काम करतो.
कसा खावा?
दोन किंवा तीन ताजे आवळे घेऊन त्यातील बिया काढून टाकाव्यात, मिक्सरमध्ये गरम पाणी टाकून बारीक करावा व मग गाळून घ्यावा आणि तत्काळ घ्यावा. गरज पडल्यास यात आले, ओली हळददेखील आपण टाकू शकतो. आवळ्याच्या हंगामात हे शक्य आहे. त्यामुळे आवळा मिळणार नाही, तेव्हा आवळा पावडर घ्यावी.
माझ्याकडे येणाऱ्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला मी आहारामध्ये सकाळी आवळा घेण्याची सूचना देते. आमच्या आहाराचा तो एक मुख्य भाग असतो. अग्रक्रम असतो तो ताजा आवळा ज्यूस घेण्यासाठी, त्यानंतर आवळा पावडर किंवा चूर्ण घ्यावे. तयार बाटलीबंद आवळा रस बिलकूल घ्यायचा नाही. कारण त्यात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. आता आवळा सकाळी का घ्यायचा याची काही खास कारणे आहेत.
– अर्चना रायरीकर, आहारतज्ञ





























































