लोटपोट हसा, आजार टाळा

29

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पोट दुखेपर्यंत हसल्याने आयुष्य वाढतं अशी घरातील मोठी मंडळी सहज बोलतात. त्यात किती तथ्य आहे हे नुकतचं एका संशोधनातून समोर आलं आहे. हसल्याने मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अनेक आजारांचा धोका टळतो.

हृद्यविकाराचा धोका टळतो….हसल्यामुळे हृदयाचा व्यायाम होतो. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हसताना शरीरात एंडोर्फिन नावाचे रसायन तयार होते. जे हृदयाला बळकट बनवते. त्यामुळे हृद्यविकाराचा धोका टळतो.

नैराश्य कमी होते
हसल्यामुळे मेंदूतील ठराविक पेशी सक्रीय होतात. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. मानसिक ताण कमी होतो. मानसिक ताणाशी संबंधित हार्मोन्सचा स्त्राव आटोक्यात येतो.

समाजात रुळणे शक्य होते
मानसिक ताणात शक्यतो व्यक्ती एकटं राहणे पसंत करते. त्यामुळे अशा व्यक्तींचे हसणे बोलणे जवळजवळ बंदच असते. पण जर कोणी हसणारी व हसवणारी व्यक्ती त्यांच्या सान्निध्यात आली तर संबंधित व्यक्तीस तणाव मुक्त होण्यास मदत मिळते.

चिरतरुण दिसण्यासाठी
हसताना आपल्या चेहऱ्यावरील 15 प्रकारच्या मांसपेशी एकत्र काम करतात. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. परिणामी चेहरा ताजा टवटवीत, तरुण दिसतो.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

हसल्यामुळे मांसपेशी सक्रीय होतात. त्यामुळे शरीरभर रक्तभिसरण क्रिया व्यवस्थित होते. ऑक्सिजनमधील कॅन्सरच्या पेशी व इतर विषाणूंचा नाश होतो. रक्ताभिसरणामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

आपली प्रतिक्रिया द्या