चहामध्ये पुदिन्याची पाने घातल्यावर मिळतील हे आश्चर्यचकीत करणारे फायदे

हिंदुस्थानातील प्रत्येक घराची सुरुवात ही चहाने होते. चहा बनविण्याच्या सुद्धा विविध पद्धती आहेत. अनेकजण चहामध्ये पुदिना घालतात. पुदीना चहात घातल्यामुळे त्याचे बरेचसे आरोग्यवर्धक फायदे मिळतात. पुदिन्याचा चहा पिल्याने आपल्याला अनेक हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
पावसाळ्यात लोकांना अनेकदा अपचन, गॅस आणि पोटदुखीचा त्रास होतो. पुदिन्याचा चहा या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

पुदिन्याचा चहा पिण्याचे फायदे

पुदिन्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे सर्दी आणि विषाणूजन्य ताप टाळता येतो.

पुदिना हा एक नैसर्गिक आरामदायी पदार्थ आहे. त्याचा चहा प्यायल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

पुरळ आणि ऍलर्जी सामान्य आहे. पुदिन्याचा चहा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. यामुळे त्वचा निरोगी राहते.

सायनस किंवा ऍलर्जीची समस्या असलेल्या लोकांसाठी पुदिन्याचा चहा खूप फायदेशीर आहे.

Health Tips – मासिक पाळीमध्ये 2 रुपयांचे हे फळ खायलाच हवे, वाचा

केव्हा आणि कसे सेवन करावे?
पुदिन्याचा चहा सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी नाश्त्यासोबत घेतला तर अधिक फायदेशीर ठरतो. दिवसातून एकदा हा चहा पिणे पुरेसे आहे. चहा बनवण्यासाठी, ताजी पुदिन्याची पाने उकळा आणि त्यात थोडे आले आणि लिंबू घाला. यामुळे चहाची चव आणि गुणवत्ता दोन्ही वाढते.

या गोष्टी लक्षात ठेवा

अधिक प्रमाणात पुदिन्याचा चहा पिल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते

गर्भवती महिला आणि औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ती घ्यावी.