बंगाल क्लब राज्य मानांकन कॅरम स्पर्धा – विश्वविजेता प्रशांत मोरे, काजलकुमारीला जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वविजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरे आणि काजल कुमारी यांनी बंगाल क्लबतर्फे आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे जेतेपद मिळवले.

पुरुष एकेरीत प्रशांतने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विकास धारियाला 18-9, 15-25, 10-15 असे नमवले. दोन सेटच्या बरोबरीनंतर तिसऱया सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. सातव्या बोर्डनंतर 19-14 अशी 5 गुणांची आघाडी प्रशांतकडे होती. त्याने आपली हीच लय कायम ठेवत विजय नोंदवला. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम लढतीत काजलने मुंबईच्या नीलम घोडकेवर 25-6, 22-11 असा एकतर्फी विजय मिळवला.