
सोशल मीडियावरून Wife Swapping (पत्नीची अदलाबदल) करायची जाहिरात टाकणाऱ्या एका विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या या कामात त्याची पत्नी देखील सहभागी असल्याने तिच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरू शहरात हा प्रकार घडला आहे.
विनायक एम असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याचा 2019 साली प्रेमविवाह झाला होता. विनायक व त्याच्या पत्नीला एक वर्षाचं मुल देखील आहे. विनायकला पॉर्न बघण्याचे व्यसन असून त्याच्या पत्नीला देखील पॉर्न बघायला आवडतात. विनायक व त्याची पत्नी त्यांच्या खासगी क्षणांचे चित्रिकरणही करायचे.
एके दिवशी विनायकने पत्नीला वाईफ स्वापिंग म्हणजेच बायकांची अदलाबदल याविषयी सांगितले. त्याची पत्नी देखील त्यासाठी तयार झाली. त्याकरता विनायकने ट्विटर व आणखी एका साईटवर त्यांची जाहिरात दिली. त्यासाठी विनायकने त्याच्या बायकोचे आक्षेपार्ह फोटोही पोस्ट केले होते. त्यावरून काही लोकांशी त्यांची ओळख झाली. विनायक व त्याच्या पत्नीने इतर व्यक्तींसोबत संबंधही ठेवले. सोशल मीडियावरून जेव्हा पोलिसांना हा प्रकार समजला त्यांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.




























































