55 जणांना नोकरी, आतापर्यंत 70 कुटुंबीयांना 50 लाखांची मदत;‘बेस्ट’चा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लढय़ात जीव गमावलेल्या ‘बेस्ट’ कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांतील प्रत्येकी एक याप्रमाणे आतापर्यंत 55 जणांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. तर 70 जणांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत  50 लाखांची मदत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यापासून आतापर्यंत ‘बेस्ट’च्या 2 हजार 958 कर्मचाऱयांना कोरोना संसर्ग झाला असून यातील 2834 जण म्हणजेच 96 टक्के कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा डय़ुटीवर हजर झाले आहेत.

मुंबईत कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी केवळ बेस्टचाच आधार होता. लोकल बंद असताना या कर्मचाऱयांनी बेस्टचीच सेवा फायदेशीर ठरली. मात्र मुंबईकरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असताना हजारो कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र ‘बेस्ट’ प्रशासनाने या मृत कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना वाऱयावर सोडले नाही. मृत कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत देण्यात येत असून कुटुंबातील एकाला ‘बेस्ट’च्या सेवेत सामावून घेतले जात असल्याची माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोनाबाधित कर्मचारी    2,958

कोरोनामुक्त कर्मचारी      2,834

सध्या उपचारासाठी दाखल 21

ऑक्सिजनवर        1