‘संप’णार कधी? बैठक निष्फळ; बेस्ट कामगार आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेस्टच्या कर्मचाऱयांनी पुकारलेला संप आज सलग तिसऱया दिवशीही सुरू होता. कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी संप मागे घेण्यास नकार दिल्यामुळे आज दिवसभरात एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे सलग तिसऱया दिवशी मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागले, तर कर्मचाऱयांचे नातेवाईकही आज आंदोलनात उतरले. बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी दिवसभर आज बैठकांवर बैठका सुरू होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणताच तोडगा निघाला नाही.

संप चिघळणार? विद्युत विभागाचे कर्मचारीही आजपासून संपावर
बेस्टच्या कामगारांना विद्युत विभागातील कामगारांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. रात्री उशिरापर्यंत बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यामुळे द इलेक्ट्रिकल युनियनने आपले 6000 कर्मचारी उद्या संपात सहभागी होतील असे जाहीर केले आहे. संघटनेचे सरचिटणीस संजय घाडीगांवकर यांनी तसे पत्रक काढले