बेस्टचा खाजगी शाळांसाठी सवलत पास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाने आता खाजगी शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध केला आहे. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट मोफत प्रवासाची सुविधा देत असते. आता खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनाही सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध होणार आहे. खाजगी शाळांमधील आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता इयत्ता इयत्ता 5वीपर्यंत 200 रुपये, इयत्ता 6 वी ते 10 वीपर्यंत 250 रुपये आणि इयत्ता 11 वी आणि 12 वी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता 350 रुपये अशा माफक दरामध्ये बेस्ट पास मिळणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाईनदेखील अर्ज करू शकतात.