
हिंदुस्थानातील सर्वात मोठ्या टेक्निकल कंपन्यांपैकी एक असलेल्या बेटरप्लेसने एक खास मोबाइल अॅप्लिकेशन आणले आहे, ज्यातून देशभरातील कामगार वर्गातील रोजगार शोधणाऱ्या लोकांना नोकरी शोधण्यास मदत मिळेल आणि त्यांच्या कौशल्याच्या गरजांचीही पूर्तता होऊ शकेल. या अॅप्लिकेशनमध्ये 1200 पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या 10 लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी दाखवल्या जातील. सातत्याने कामगार वर्गातील मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्याचे वचन कायम राखण्याच्या हेतूने बेटरप्लेसकडून देशात नोकरी शोधणाऱ्या लाखो लोकांसाठी संधी दिल्या जात आहेत आणि कोणत्याही ठिकाणाहून अर्ज करता येणार आहे.
हिंदुस्थानच्या वैविध्यपूर्णतेला पूरक ठरणारे हे अॅप 6 भाषांमध्ये बहुभाषिक वापरकर्ता इंटरफेससोबत तयार केलेले आहे – इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तामिळ, हिंग्लिश (दोन्ही भाषांच्या स्वीकारासाठी हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण). इच्छुक उमेदवारांना या अॅपवर आपला सीव्ही मोफत बनवता येईल आणि आपले मित्र किंवा सहकाऱ्यांना संदर्भासाठी पाठवता येईल. विविध प्रकारच्या 1000 कार्यासाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. जसे डिलिव्हरी पार्टनर, रायडर पार्टनर, ड्रायव्हर पार्टनर, फील्ड असोसिएट्स, रिटेल असोसिएट्स, टेलिकॉलर्स, इलेक्ट्रिशियन इत्यादी आणि उमेदवारांना मासिक 30,000 रूपयांपर्यंत वेतन मिळवता येईल. वापरकर्त्याला देशातील कोणत्याही भागातून लॉगिन करून आपले प्रोफाइल तयार करता येईल आणि आपल्या इच्छुक नोकरी/ संधीसाठी अर्ज करता येईल.
























































