भाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आणि त्यांना खळखळून हसवणारा पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई- व्यक्ती की वल्ली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा भाग चित्रपटाचा पूर्वार्ध असून त्याच्या उत्तरार्धाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बाबा आमटे यांना मदत करण्यास गेलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या भाजीपाल्याचे दुकान समाजकंटकांनी मोडल्यावर …तर एकेकाच्या छातीत गोळ्या घातल्या असत्या हे वक्तव्य या ट्रेलरमध्ये दिसत आहे. तसेच अनेक मिश्कील आणि तिरकस विनोदांची पखरणही यात पाहायला मिळत आहे.

कला ते राजकारण आणि राजकारण ते रंगमंच प्रत्येक क्षेत्रात पुलंनी लोकांच्या मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांच्या आयुष्याचा हाच प्रतिभावान प्रवास उलगडण्याासठी ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ उत्तरार्धाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात पूर्वार्धाप्रमाणेच अनेक नामवंत चेहरे उत्तरार्धातही पाहायला मिळणार आहेत.

पाहा ट्रेलर –