Bhandara accident – स्कूल व्हॅन पलटून 10 विद्यार्थी जखमी, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला अपघात

भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा येथे भरधाव स्कूल व्हॅन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णआलयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी स्कूल व्हॅनने घरी परतत होते. याचवेळी रस्द्यावरील खड्ड्यांना चुकवण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कूल व्हॅन पुलावरील खाली कोसळली. सुरेवाडा येथे हा अपघात झाला. यात 10 विद्यार्थी जखमी झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवले. यावेळी रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती.