भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर 
शनिवारी दुपारी  2 वाजता भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता धरणाचा पाणीसाठा 10500 दलघफू झाला आहे. सद्या वीजनिर्मिती द्वारे 825 क्यूसेक, तसेच स्पिलवे द्वारे 3600  क्यूसेक असे एकूण 4425 क्यूसेकने विसर्ग  धरणातून सोडण्यात आला आहे.
मागच्या वर्षी 9 ऑगस्टला भंडारदरा धरण भरले होते. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही. निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4500 दलघफू आहे.
निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलीस विभागांना कळविण्यात येणार असल्याचे देखील जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.