
कोरोना महामारीविरुद्ध लढाईत हिंदुस्थानला लवकरच आणखी एक लस मिळण्याची शक्यता आहे. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस भारत बायोटेकला मंजुरी मिळाली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत बायोटेकद्वारे विकसित नाकावाटे दिल्या जाणाऱ्या पहिल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस परवानगी मिळाली आहे. या लसीच्या निर्मितीमध्ये बायोटेक्नोलॉजी विभाग आणि बीआयआरएसीने सहाय्य केले आहे.
First Nasal Vaccine developed by Bharat Biotech supported by Department of Biotechnology (DBT) and its PSU, Biotechnology Industry Research Assistance Council (BIRAC) gets a nod of regulator for Phase 2/3 Trial: Ministry of Science & Technology
— ANI (@ANI) August 13, 2021
53 कोटी नागरिकांचे लसीकरण
देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 53 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 60,40,607 सत्रांद्वारे 52,95,82,956 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 57,31,574 मात्रा देण्यात आल्या.





























































