
‘भारतरत्न’ गानकोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या उभारणीसाठी नव्याने सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर या समितीचे अध्यक्ष असून या समितीने जानेवारी 2021 मध्ये नेमलेल्या अभ्यास समितीतील सदस्यांसोबत विचारविनिमय करून महाविद्यालय स्थापनेसंबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करायचा आहे. याविषयीचा शासननिर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, पंडित शिवकुमार शर्मा हे सदस्य असणार असून मयूरेश पै हे समन्वयक तर कला संचालक सदस्य सचिव असणार आहेत. या संगीत महाविद्यालयाचे ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात येणार आहे.
संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रचार आणि प्रसार
संगीताचा शास्त्र्ाशुद्ध अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार सुसज्ज, अत्याधुनिक अशा सोयीसुविधांनी युक्त भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाद्वारे करण्यात येणार आहे. तसेच या महाविद्यालयात हिंदुस्थानी लोकसंगीत, शास्त्र्ााrय संगीत, संगीत वाद्ये त्याचबरोबर लतादीदींच्या जीवनावर आधारित माहिती, वस्तू पहायला मिळणार आहेत. राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालय नियंत्रणाखाली कलीना संकुल येथे हे भव्य महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

























































